Monday, 17 December 2018

कर्नाटकाच्या लोकायुक्तांवर चाकू हल्ला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, कर्नाटक

कर्नाटकाचे लोकायुक्त पी. विश्वनाथ शेट्टी यांना त्यांच्या कार्यालयात घुसून चाकूने भोसकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेट्टी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पी.विश्वनाथ शेट्टी त्यांच्या कार्यालयात एका खटल्याची सुनावणी करत होते. त्यावेळी संजय शर्मा नावाचा व्यक्ती धारदार चाकू घेऊन कार्यालयात आला आणि त्याने अचानक शेट्टी यांच्यावर तीनवेळा वार केले. त्यामुळे शेट्टी जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडले. यावेळी सुनावणीसाठी आलेल्यांनी पोलिसांना या घटनेची तात्काळ माहिती देत शेट्टी यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य