Monday, 17 December 2018

अपघातग्रस्तांच्या ताब्यात असलेल्या बसेसची अखेर सुटका

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, कर्नाटक

अपघाताच्या नुकसानभरपाई प्रकरणी गेल्या आठ दिवसांपासून जप्त करण्यात आलेल्या कर्नाटक सरकारच्या दोन बसेस सोमवारी पैसे भरल्यानंतर सोडण्यात आल्या. न्यायालयाच्या निकालानुसार 27 लाखांचा डीडी न्यायालयात भरल्यानंतर न्यायालयाने कर्नाटक सरकारच्या दोन बस गाड्या सोडण्याचे आदेश दिले. यानंतर कर्नाटकचे महामंडळ अधिकारी बसचे चालक वाहन यांच्या ताब्यात तक्रारदार श्वेता गांधी यांनी कर्नाटक सरकारच्या दोन बसेस दिल्या.

सांगली न्यायालयाच्या या निकालामुळे राज्यात एक आदर्शवादी निर्णय झाला. अपघात करणाऱ्या बसच ताब्यात घेतल्याने कर्नाटक सरकारने अखेर पैसे भरून आपल्या बसेस नेल्या. याबाबत जयमहाराष्ट्रने आवाज उठविला होता. त्यामुळे तक्रादारांनी जय महाराष्ट्रचे आभार मानले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य