Monday, 17 December 2018

अभिनेत्री श्रीदेवी आणि ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना ऑस्करकडून श्रद्धांजली

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जगातील मानाचा पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. यंदा 90 वे एकॅडमी एवॉर्डस अर्थात ऑस्कर पुरस्कार दिले जाताहेत. बरोबर 88 वर्षांपूर्वी 16 मे रोजी पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा संपन्न झाला होता. यंदाचा मुख्य कार्यक्रम लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये सोमवारी पहाटे 5 वाजल्यापासून सुरु आहे. हॉलिवूड अभिनेता जिम्मी किमेल यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचलन करत आहेत. यात रेड कार्पेटपासून ते मेकअप आर्टीस्ट आणि बॅकस्टेजपासून ते विजेत्यांपर्यंतची सर्व तयारी पूर्णत्वाला आलीये.

ऑस्कर ट्रॉफीची वैशिष्टये

अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड फॉर मेरिट या अधिकृत नावानं सन्मानचिन्हाची ओळख आहे.

ऑस्कर ट्रॉफी ब्रिटॅनिअम धातूपासून तयार केली जाते.

क्रुसेडर्स तलवार घेऊन उभ्या असलेल्या सरदाराची मूर्ती असते.

ऑस्कर ट्रॉफीची उंची 34 सेंमी तर वजन 3.85 किग्रॅ असतं.

ट्रॉफीची सन्मानचिन्हाच्या पायाखाली 5 ‘स्पोक’दिसतात.

हे 5 स्पोक लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते, तंत्रज्ञ यांचं प्रतिनिधित्व करतात.

कलादिग्दर्शक सेड्रिक गिबन्स, जॉर्ज स्टॅन्लेने यांनी ऑस्कर डिझाइन केलं.

यंदा ऑस्करच्या शर्यतीत गईलर्मो डेल टोरोच्या 'द शेप ऑफ वॉटर' या चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे 13 विभागात नामांकनं मिळाली आहेत. याआधी 'ऑल अबाऊट इव', 'टायटॅनिक' आणि 'ला ला ला लॅन्ड' या चित्रपटांना सर्वाधिक नामांकनं मिळाली होती.

'मडबाऊंड' या चित्रपटाला 5 विभागात, तर 'गेट आऊट' या चित्रपटाला 4 विभागात नामांकनं मिळाली आहेत.

विशेष म्हणजे, अभिनेत्री श्रीदेवी आणि ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना अकॅडमी अवॉर्ड्सतर्फे श्रद्धांजली देण्यात आली. दिवंगत कलाकारांच्या मोंटाजमध्ये श्रीदेवी आणि शशी कपूर यांचे फोटो दाखवून त्यांना मानवंदना देण्यात आली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य