Sunday, 20 January 2019

सांघिक स्नूकर वर्ल्ड कप स्पर्धेत भारतानं पाकिस्तानला नमवलं

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारताने पंकज अडवाणी आणि मनन चंद्रा यांच्या सुरेख खेळाच्या जोरावर पाकिस्तानला नमवून विजेतेपद पटकावले आहे. सांघिक स्नूकर वर्ल्ड कप स्पर्धेत भारतानं पाकिस्तानचा 3-2 असा पराभव केलाय आहे. भारताच्या पंकज अडवाणी आणि मनन चंद्रा यांच्या जबरदस्त खेळीमुळे भारताला विजेतेपद मिळाल आहे.

सुरुवातीच्या वेळी भारत 0-2 असा पिछाडीवर होता आणि तिसऱ्या फ्रेममध्ये भारत 0-30 असा मागे होता. पण, चंद्राने केलेल्या दिमाखदार कामगिरीच्या जोरावर भारताने ही पिछाडी भरून काढली. या दोघांच्या खेळामुळे भारताला विजयश्री प्राप्त झालीय.

सुरूवातीला भारताची ही जोडी पिछाडीवर होती. काल रात्री झालेल्या बेस्ट ऑफ फाइव फाइनलमध्ये भारत ०-२ असा पिछाडीवर होता आणि तिसऱ्या फ्रेममध्ये भारत ०-३० असा मागे होता. पण, चंद्राने केलेल्या दिमाखदार कामगिरीच्या जोरावर भारताने ही पिछाडी भरून काढली. चौथ्या फ्रेममध्येही अडवाणी १-२० असा बाबर मसिहविरुद्ध मागे पडला होता. पण, त्याने आपली स्नूकरवरील हुकुमत सिद्ध करत ६९ गुणांच्या ब्रेकसह ही फ्रेम जिंकली. त्यामुळे भारताने २-२ अशी बरोबरी साधली.

अखेरच्या फ्रेममध्ये चंद्रा आणि पाकिस्तानचा महंमद आसिफ यांच्यात चुरस पाहायला मिळाली. चंद्राने मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करत अखेरची फ्रेमही जिंकली आणि एकवेळ ०-२ अशा पिछाडीमुळे हातून निसटत चाललेली लढत जिंकून दाखविली.

पहिल्या फ्रेममध्ये मसिहने चंद्रावर ७३-२४ अशी सहज मात केली होती, तर दुसऱ्या फ्रेममध्ये आसिफने अडवाणीला ६१-५६ असे नमविले. तिसऱ्या फ्रेममध्ये दोन्ही संघांच्या दोन खेळाडूंना खेळण्याची संधी होती आणि त्यात भारताने ७२-४७ असा विजय मिळविला आणि आव्हान जिवंत ठेवले.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य