Sunday, 20 January 2019

सीबीआयची कारवाई, कार्ती चिदंबरमला मुंबईत आणलं

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

रविवार सकाळी कार्ती चिदंबरम यांना मुंबईला आणण्यात आल. कार्ती चिदंबरम यांना सीबीआईने अटक करून थेट भायखळा जेल मध्ये नेण्यात आल आहे.

पी चिदंबरम देशाचे अर्थमंत्री असताना आएनएक्स मीडिया मध्ये परदेशी गुतवणूकास मंजूरी देऊन लाच घेतल्याचा ठपका कार्ती चिदंबरम यांच्यावर आहे.

याआधीही कार्ती यांच्या घरावर आणि कार्यालयांवर अनेकदा सीबीआयनं छापे टाकले आहेत. आयएनएक्स मीडियाला परदेशातून पैसे मिळवता यावे, यासाठी एफआयपीबी या सरकारी संस्थेकडून परवानगी मिळाली होती. त्यावेळी चिदंबरम गृहमंत्री होते. याचाच फायदा घेऊन कार्तीने परदेशातून पैसे घेतले, आणि पैशांचा गैरव्यवहार केला, असा त्यांच्यावर आरोप आहे.

या प्रकरणी तपासाला त्यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने बुधवारी सीबीआयकडून त्याला अटक करण्यात आली होती.

कार्ती चिदंबरम यांना पुढील तपासासाठी मुंबईत आणंल आहे. आयएनएक्स मिडीया केस संदर्भात चौकशी करण्यासाठी सीबीआयने कार्ती चिदंबरमला मुंबईत आणलं.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य