Tuesday, 20 November 2018

छत्तीसगढ-तेलंगणा पोलिसांची संयुक्त कारवाई, 10 नक्षलवाद्यांचा खात्मा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 वृत्तसंस्था, छत्तीसगढ

छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित भाग असलेल्या बिजापूरमध्ये सुरक्षा दलांनी 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. छत्तीसगढ-तेलंगणा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये, नक्षलवाद्यांना मारण्यात यश लाभले आहे. पुजारी कांकेर या नक्षलग्रस्त भागात पोलिस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीमध्ये 10 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला.

या भागात मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी असल्याची माहिती छत्तीसगड आणि तेलंगणा पोलिसांना मिळाली होती. विशेष म्हणजे महासंचालक डी. ए. अवस्थी यांनी नक्षलविरोधी मोहीमेला दुजोरा दिला. दोन्ही राज्यांचे पोलिस जंगलात घुसताच, नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. काही वेळेच्या गोळीबारानंतर नक्षलवादी तेथून फरारा झाले. असे पोलिसांनी सांगितले.

गोळीबार थांबल्यावर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली, तेव्हा पोलिसांना नक्षलवाद्यांचे 10 मृतदेह सापडले. या नक्षलवाद्यांची ओळख पटली असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. दंतेवाडा पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत मात्र, ३ पोलीस जखमी झाले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य