Tuesday, 20 November 2018

कर्नाटकला झटका; अपघातग्रस्त कुटुंबाला 27 लाखाची नुकसान भरपाई

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, कर्नाटक

सांगलीच्या सिव्हिल रोडवर चार वर्षांपूर्वी कर्नाटक परिवहन विभागाच्या बागलकोट डेपोच्या बसने प्रकाश गांधी यांना चिरडले होते. या अपघातात गांधी यांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर गांधी कुटुंबीयांनी न्यायालयीन लढा लढत अपघातग्रस्त कर्नाटक सरकारच्या बागलकोट डेपोला 27 लाखाची नुकसान भरपाई देण्याचा निकाल दिला होता.

यावेळी गेली वर्षभर नुकसान भरपाई देण्यासाठी कर्नाटक परिवहन विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याने अखेर 27 फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायालयाने कर्नाटक डेपोच्या बागलकोट आगराच्या बसेस जप्त करून अपघातग्रस्त कुटुंबियाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.

या बसेस सध्या गांधी यांच्या घरासमोरील जागेवर उभ्या करण्यात आल्या असून कर्नाटक सरकारने 27 लाखांची नुकसान भरपाई दिल्यानंतरच या बसेस सोडल्या जातील असा पवित्रा सांगलीच्या गांधी कुटुंबीयांनी घेतला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य