Tuesday, 20 November 2018

शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे निधन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, तमिळनाडू

तामिळनाडूमधील कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं बुधवारी सकाळी  हृदयविकाराच्या तीव्र झटक्ययानं निधन झालं. कांची कामकोटी पीठाचे ते 69 वे शंकराचार्य होते. गेल्या वर्षापासून त्यांची तब्बेत खालावली होती. गेल्या काही महिन्यांपासून शंकराचार्य जयेंद्र सरस्वती आजारी होते. ते 82 वर्षांचे होते. त्यांचे शरीर उपचाराला साथ देत नव्हते. 

चेन्नईतील श्री रामचंद्र रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मागील महिन्यांत त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. त्यांना कमी रक्तदाबाचाही त्रास होता. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुढे त्यांची प्रकृती आणखीनच खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. जयेंद्र सरस्वती यांचा जन्म 18 जुलै 1935 मध्ये झाला होता. त्यांचे मूळ नाव सुब्रमण्यम महादेव अय्यर असे होते. ते कांचीपुरम पीठाचे 69 वे शंकराचार्य असून 1954 मध्ये उत्तराधिकारी म्हणून शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या नावाची घोषणा केली होती.  

चंद्रशेखरेंन्द्र यांनीच सुब्रमण्यम यांना जयेंद्र सरस्वतीचे हे नाव दिले.  शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी कांचीपूरम मठाचे अधिपती म्हणून 50 वर्षे पूर्ण केली होती. कांचीपुरम वरदाराजा पेरुमल मंदिराचे व्यवस्थापक शंकररामन यांच्या हत्या प्रकरणात जयेंद्र सरस्वती यांच्यासह 22 जणांवर आरोप करण्यात आले होते. 2004 साली दिवाळीच्या दिवशी जयेंद्र सरस्वतींना अटक झाली. मात्र, न्यायालयाने त्यांची या आरोपातून निर्दोष मुक्तता केली होती. गुरुवारी सकाळी आठ वाजता जयेंद्र सरस्वती यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य