Friday, 18 January 2019

अश्लिल व्हिडीओ प्रसारीत करणारा व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन अखेर अटकेत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली  

दिवसेंदिवस सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर वाढत जातोय. युवा पिढीच्या मानसिकतेत जसे त्याचे चांगले परिणाम दिसून येतात तसेच त्याचे वाईट परिणाम उद्भवत आहेत. सोशल साइट्सचा होणारा प्रभाव हा वाढत आहे यात फेसबुक, ट्विटर, इन्सटाग्राम, मेंसेंजर, इ.वेगवेगळे पर्याय हे आजच्य़ा युवा पिढीकडे निर्मीण झालेले आहेत. व्हॉट्स अॅप हे त्यातील लोकप्रिय अॅप म्हणून ओळखल जात. वापरण्यासाठी अगदी सोप त्यामुळे व्हॉट्स अॅप लोकांच्या मनात अपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु याचाच गैर वापर करत काही लोकांनी व्हॉट्सअॅप ग्रुप द्वारे अश्लिल व्हिडीओंचा आणि फितीचित्र प्रसार केल्याच समोर आले आहे. अशाच एका  निखिल वर्मा नामक इसमाला सीबीआयने अटक केली आहे.

उत्तर प्रदेशातील कन्नौजमधील निखिल वर्मा(२०) हा तरुण व्हॉट्सअॅप ग्रुप चालवत होता. त्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा अडमिन देखील तोच होता. या ग्रुपमध्ये त्याने अमेरिका, न्युझिलंड, मेक्सिको, अफगाणिस्तन, ब्राझिल, केनिया आणि श्रीलंका अशा परदेशी लोकांचा समावेश त्याने करवून घेतला होता. तब्बल ११९ सदस्यांचा हा ग्रुप बनवून त्याने अश्लिल व्हिडीओंचा प्रसार केले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर अश्लिल व्हिडीओ प्रसारीत करणारी ही टोळी अखेर सीबीआयने उध्वस्त केली. या प्रकरणी निखिलला अटक करण्यात आली आहे.निखिल.‘किड्सएक्सएक्सएक्स’ हा ग्रुप तो चालवत होता.

loading...

Top 10 News

राशी भविष्य