Tuesday, 11 December 2018

देशातील पहिली महिला ‘फ्लाइंग ऑफिसर’ अवनी, आकाशात घेतली नवी झेप

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 भारतीय वायुसेनेत दाखल झालेल्या ‘फ्लाइंग ऑफिसर’ अवनी चतुर्वेदी हिने मिग-21 ‘बायसन’ हे लढाऊ विमान उडवून इतिहास रचला. १९ फेब्रुवारीला सकाळी गुजरातच्या जामनगर लष्करी हवाई तळावरून मिग-21 हे युद्धविमान एकटीनं उडवून तिने पहिली भारतीय महिला वैमानिक होण्याचा मानही पटकावला.

 या मोहिमेला सुरूवात करण्यापूर्वी तिच्या प्रशिक्षकांनी मिग-२१ ‘बायसन’ विमानाची पडताळणी केली. अवनीला प्रोत्साहन देण्यासाठी तिचे प्रशिक्षक, अनुभवी फ्लायर्स, लष्करी हवाई तळावरील नियंत्रण कक्ष उपस्थित होते.

मिग-21 ‘बायसन’ जगातील सर्वाधिक लँडिग आणि टेक-ऑफ स्पीड असणारे विमान आहे. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी अवनी ने आदर्श निर्माण केला आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य