Tuesday, 13 November 2018

बुलेट ट्रेनच्या मार्गात ठाणे-विरार खाडीतून भुयारी मार्ग नेण्यात येणार असल्याने मोठा अडथळा दूर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या पहिल्यावहिल्या बुलेट ट्रेनच्या मार्गक्रमणात ठाणे ते विरार खाडीतून २१ किमीचा भुयारी मार्ग नेण्यात येणार आहे. त्यामुळे जमीन उपलब्ध होण्यातील अडचण दूर होणार आहे. या बोगद्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात भूकंपप्रतिरोधक क्षमता चाचणीचा समावेश आहे. या संपूर्ण मार्गात आठ बोगद्यांचा समावेश असून ठाणे ते विरार हा सर्वाधिक मोठा भुयारी मार्ग ठरणार आहे. 

बुलेट ट्रेनचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कामे सुरू केली आहे. प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात केली जाणार आहे. हिरवा कंदील मिळणाऱ्या जागांवर कामे हाती घेतली आहेत. यंदाच्यावर्षी जून पासून मार्ग उभारणीसाठी कामे हाती घेतली जाणार असून त्यात मुंबई, बडोदा आदी भागांचा समावेश आहे. 

बुलेट ट्रेनसाठी २९ हजार कर्मचारी लागणार आहेत. ४ हजार कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या बडोदा येथील रेल्वे विद्यापीठात प्रशिक्षण दिले जाणार असून त्याचाच भाग म्हणून तिथल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी जपानमध्ये पाठवण्यात येणार आहे.

बुलेट ट्रेन विषयी अधीक माहिती

बुलेट ट्रेनच्या मार्गात ४७ पुलांचा समावेश असून त्यापैकी राज्यात २७ पूल असतील.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे अंतर ५०८ किमी असून त्यासाठी अंदाजे एक लाख आठ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत.

बुलेट ट्रेन देशाच्या ७५व्या स्वातंत्रदिनी, १५ ऑगस्ट २०२२ रोजी सुरू करण्याचा निर्णय आहे.

या ट्रेनचा वेग ताशी ३५० किमी असला तरीही प्रत्यक्षातील सरासरी वेग ताशी ३२० किमी असेल. ५०८ किमीचे हे अंतर बुलेट ट्रेन दोन तासांत पूर्ण करेल, असा दावा करण्यात येत आहे.

देशातील सर्वाधिक वेगवान गाड्यांमध्ये समावेश असलेल्या दुरांतो एक्स्प्रेसमधून मुंबई ते अहमदाबाद अंतर पूर्ण करण्यासाठी किमान सात तास लागतात. 

जपानमध्ये धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी ई-५ मालिकेचे इंजिन वापरण्यात येत असल्याने त्यावर आधारित हे मॉडेल असेल.

निविदा प्रक्रियेत जपानसाठी २० टक्के प्रमाण आरक्षित ठेवण्यात आले असून ८० टक्के भाग देश वा जागतिक स्तरावरील कंपन्यांसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे. 

प्रत्यक्ष इंजिन निर्मितीसाठी मेक इन इंडिया संकल्पना वापरताना जपानमधील तंत्रज्ञानाचे सहाय्य घेतले जाणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य