Thursday, 17 January 2019

दहशतवाद्यांच्या चकमकीत मुस्लिम जवान शहीद झाल्यानंतर ओवैसी म्हणतात देशभक्तीवर संशय घेणाऱ्यांनी त्यातून धडा घ्यावा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

‘काश्मीरमध्ये सुरु असलेल्या दहशतवाद्यांच्या थैमानात शहीद झालेल्यांमध्ये 5 जण मुस्लिम आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या देशभक्तीवर संशय घेणाऱ्यांनी त्यातून धडा घ्यावा.’ असं वक्तव्य एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केलं.

गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी नेत्यांमधे आणि ओवेसींच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. त्याच मुद्याला पकडून ओवेसी यांनी असं परखड उत्तर दिलं आहे. ‘काश्मीरमध्ये सत्ताधारी भाजप आणि पीडीपी हे दोन्ही पक्ष नौटंकी करत असून, फक्त मलई खाण्याचे उद्योग सुरु आहेत.’ असा आरोपही ओवेसी यांनी केला आहे.

मंगळवारी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाबाजी करत काश्मीरकरांनी आपलं काश्मीरचं खोरं दुमदुमून टाकलं. सुंजवाँमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना अखेरचा निरोप देताना काश्मीरच्या नागरिकांनी पाकिस्तानला चांगलेच फटकारले.

मागील काही दिवसांपासून अतिरेक्यांनी भारतीय लष्करी तळांवर हल्ले सुरु केले आहेत. हल्ल्यांना तोंड देत असताना दोन दिवसात एकूण 6 जवान शहीद झाले, तर एक नागरिक मृत्युमुखी पडला.

सुभेदार मदन लाल चौधरी, सुभेदार मोहम्मद अशरफ मीर, हवलदार हबीबुल्ला कुरैशी, नायक मंजूर अहमद आणि लान्स नायक मोहम्मद इकबाल यांना या हल्ल्यामध्ये वीरमरण आलं.

loading...

Top 10 News

राशी भविष्य