Friday, 18 January 2019

दहशतवादी हल्ल्यात गर्भवती महिलेची प्रसुती; जवानांना दिले धन्यवाद

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सुंजवान येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामधे 5 जवान शहीद झालेत. तर 4 दहशतवाद्यांना ठार करण्यात सैन्याला यश आले. तब्बल 30 तासांनंतर चकमक थांबली. या चकमकीत 10 नागरीकही जखमी झाले. यात 6 महिला आणि एका लहान मुलीचाही समावेश आहे. यात एक गर्भवती महिलाही जखमी झाली होती. या महिलेला वाचवण्यासाठी सैन्यातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.

महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. या महिलेने एका गोड मुलीला जन्म दिला. त्या आईची आणि त्या मुलीची प्रकृती आता स्थिर आहे. दहशतवादी हल्ल्यात या महिलेला गोळी लागली होती. त्यानंतर उपचाराकरिता तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर महिलेची प्रसुती करण्यात आली. प्रसुतीनंतर महिलेने म्हटले की, तिला जवानांचा अभिमान आहे. तिचा आणि मुलीचा जीव वाचवण्यासाठी त्यांना धन्यवाद देते. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य