Thursday, 22 February 2018

मॉस्को शहराबाहेर रशियाचं विमान कोसळल; अपघातात 71 प्रवासी ठार झाल्याची भीती

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

मॉस्को शहराबाहेर रशियाचं विमान कोसळले आहे. यात 71 प्रवाशी ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येतेये.

'सारातोव एअरलाइन्सचे 'अँतोनोव एन-148' या विमानाला अपघात झालाये. हे विमान दोमोदेदोवो विमानतळावरून ओर्स्कला जात असताना ही दुर्घटना घडलीये. 

या विमानात 65 प्रवाशी, आणि पायलटसह अन्य 6 जण होते, अशी माहिती सुत्रांनी दिलीये. तसेच दुर्घटनाग्रस्त विमानाचे काही अंश सापडलेत. 

दरम्यान, विमानाला अपघात कशामुळे झाला याबाबत रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाहीये.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News