Tuesday, 13 November 2018

तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत शिरुन ‘त्याने’ स्वत:ला पेटवून घेतलं आणि तिलाही मिठीत ओढण्याचा केला प्रयत्न

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे एका आरोपी स्वत:ला पेटवून घेत साक्ष देणाऱ्या तरुणीलाही पेटवल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातल्या छिंदवाडामध्ये घडली आहे.

हा सर्व प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. काही दिवसांपूर्वी या आरोपीने मुलीचे अश्लील फोटो इंटरनेटवर व्हायरल केले होते.

याप्रकरणी या मुलीच्या मैत्रिणीनं कोर्टात साक्ष दिली. यानंतर आरोपीला बेड्याही ठोकण्यात आल्या. मात्र, जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याने साक्षीदार असणाऱ्या मुलीवर साक्ष बदलण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली....साक्षीदार असलेल्या मुलीनं न ऐकल्यानं शेवटी त्यानं तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत शिरुन स्वत:ला पेटवून घेतलं आणि त्या मुलीलाही आपल्या जवळ ओढलं.

दरम्यान, हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी वेळीच दोघांवरही पाणी ओतलं. पण या घटनेत साक्षीदार मुलीसह आरोपीही गंभीर जखमी झालाय. त्या दोघांनांही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून याप्रकरणी छिंदवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य