Friday, 18 January 2019

‘आपण पंतप्रधान झालो हेच मोदी विसरले आहेत’ – राहुल गांधी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पंतप्रधानांच्या लोकसभेतील घणाघाती भाषणावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पलटवार केलाय. पंतप्रधानांनी केलेल्या 90 मिनिटांच्या भाषणात राफेलबाबत त्यांनी ब्र देखील काढला नाही. अशी टीका राहुल गांधींनी केली. बुधवारी पंतप्रधान मोदींनी लोकसभेत केलेल्या भाषणात कॉंग्रसच्या कारकीर्दीतील घटनांचा पाढा वाचला. या भाषणात पंतप्रधानांनी शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, वाढते गुन्हे या विषयांवर बोलतील अशी अपेक्षा सगळ्यांना होती. परंतु, भाषणात मोदी कटंग्रसवर टीका करताना पाहायला मिळाले.

मोदींच्या या भाषणांनंतर राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या भाषणाला निव्वळ राजकीय भाषण असल्याचे म्हटले आहे. आपण पंतप्रधान झालो आहोत हेच मोदी विसरले आहेत. त्यांनी विरोधकांवर आरोप न करता त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत असेही राहुल म्हणाले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य