Monday, 21 January 2019

पाकिस्तानकडून झालेल्या रॉकेट हल्ल्यात 4 जवान शहिद, आपल्याकडे असलेले मिसाईल्स फक्त 26 जानेवारीला प्रदर्शन करण्यापुरतेच? – संजय राऊत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील भीमबेर आणि मंझाकोट सेक्टरमध्ये पाकीस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले गेले. यात एका अधिकाऱ्यांसह 3 जवानांनी आपला जीव गमावला, ते देशासाठी शहीद झाले . तर इतर दोघेजण गंभीर जखमी अवस्थेत आहेत.

यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. व तिखट शब्दांचा वापर करत भारताकडून ठोस पाऊल का उचललं जात नाही अशा भावना व्यक्त केल्या.   

पत्रकाराशी बातचीत करताना त्यानी सरळसरळ भाजप सरकारवर निशाणा साधला आणि शहीदांविषयी आपली दिलगीरी व्यक्त केली.

‘पाकिस्तान सतत भारतावर हल्ले करतो आहे. काश्मिर जो भारताचा एक भाग आहे, तेथे नेहमी अशांतता ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मग आपल सरकार गप्प का? पाकिस्तानने रॉकेटने हल्ला केल्याने 4 जवान शहिद झालेत. मग, आपल्याकडे असलेले मिसाईल्स फक्त 26 जानेवारीला प्रदर्शन करण्यापुरतेच आहे का?’ अशा कडक शब्दात त्यांनी भाजप सरकारची कान उघडणी केली.

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य