Monday, 17 December 2018

मतदारांचा मोदींना दणका, लोकसभा निवडणुकीत ‘विजय’ काँग्रेसचं

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या दोन्ही राज्यात सर्वच जागांवर भाजपाचा पराभव झाला आहे. राजस्थानमध्ये ब-याच काळापासून संघर्ष करणा-या काँग्रेसला अखेर दिलासा मिळाला असून पश्चिम बंगालच्या जनतेने तृणमुलवर आपले ‘प्रेम’ कायम ठेवले आहे. गुरुवारी संपूर्ण देशाचे लक्ष बजेटवर लागलेले असताना राजस्थान आणि पश्चिम बंगालमधून आलेले निकाल भाजपासाठी धोक्याचा इशारा आहे.

राजस्थानमध्ये लोकसभेच्या दोन जागांवर तर मांडलगड विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. अलवरमधून काँग्रेस उमेदवार करण सिंह यादव यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपाच्या जसवंत सिंह यादव यांचा पराभव केला. अजमेरमधून काँग्रेस उमेदवार रघु शर्मा यांनी भाजपाच्या राम स्वरुप लांबा यांचा पराभव केला.राजस्थानमध्ये वर्षअखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे सेमीफायनल म्हणून पाहिले जात होते. 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य