Sunday, 16 December 2018

‘काहानी मे ट्विस्ट’; धावत्या ट्रेन सोबत काढलेल्या 'त्या' थरारक सेल्फी व्हिडिओबाबत धक्कादायक माहिती उघड

User Rating: 4 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

राज्यात सर्वत्र सेल्फिचा क्रेज पसरला आहे. विविध ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या पोज देत फोटो काढणे जणू छंदच झाला आहे. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.

या व्हिडिओत एक तरुण धावत्या एक्सप्रेस समोर ऊभा असलेला पाहायला मिळाला. या व्हिडिओत हळूहळू ट्रेन त्या तरुणाच्या जवळ येते आणि काही वेळातच त्याला धडक देते.

सोशल मिडियावर या व्हिडिओला 1 लाख 60 हजार प्रेक्षकांनी पाहिले. आणि बघ्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. पण, व्हिडिओतील तरुण स्वतः मात्र शांत चित्ताने झोपला आहे.

कहानी में ट्विस्ट म्हणावा अशी काहीशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. तेलंगणामध्ये राहणारा जिम इन्स्ट्रक्टर शिवा आणि त्याच्या मित्रांनी अख्ख्या जगाला मूर्खात काढलं आहे.

कारण 'तो' व्हिडिओ म्हणजे निव्वळ एक खोटा व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे. तो संपूर्ण व्हिडिओ बनावट असून शिवाला कधी ट्रेनने उडवलंच नाही, इतकंच काय, तो साधा रेल्वे ट्रॅकजवळही उभा राहिला नाही, असं समजतं.

दरम्यान, शिवा आणि त्याच्या मित्रांचा हसत खेळत असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्याला काहीही झालेले नाही, तो मित्रांसोबत हसत खिदळत असल्याचे दिसतंय. एका वृत्तातून हे स्पष्ट झाले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य