Friday, 18 January 2019

विमानातही मोबाईल आणि इंटरनेट सेवा मिळणार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

यापुढे भारतीय हवाई हद्दीत विमान प्रवास करताना सुरूवातीचे काही तास तुम्हाला चक्क मोबाईल फोन आणि इंटरनेट सेवा वापरता येणार आहे. ट्राय म्हणजेच टेलिफोन रेग्युलेटरी अॅथॉरिटीनं 'इन-फ्लाइट कनेक्टिविटी' संदर्भात नवीन नियमावली प्रसिद्ध केलीय. त्यानुसार विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्या प्रवाशांना मोबाईल सेवा आणि वायफाय सेवा म्हणजेच इंटरनेट सेवा पुरूवू शकतात. मात्र या सेवा पुरवताना कंपन्यांना सुरक्षितेची काळजी घेणं बंधनकारक असणार आहे.

प्राथमिक स्वरूपात मिळालेल्या माहितीनुसार 3 हजार मीटर उंचीवर असणाऱ्या विमानात प्रवाशांना मोबाईल आणि इंटरनेट सेवा मिळणार आहे. त्यामुळे यापुढे नेटीझन्स मंडळी 'फ्लाईटमोड' स्टेट्स टाकून इतरांना आऊट ऑफ रेंज असल्याची सबब सांगू शकणार नाहीत.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य