Tuesday, 13 November 2018

पाकच्या कुरापतीला भारताचं चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानच्या 4 जणांचा मृत्यू तर 11 जण जखमी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार सुरु आहे. सीमेवर सुरु असलेल्या पाकिस्तानच्या कुरापतीला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. शुक्रवारपासून पाकिस्तानकडून भारताच्या 30 पोस्टवर गोळीबार करण्यात आला. त्याला बीएसएफच्या जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये चार पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरमधील आरएसपुरा, अरनिया, कानाचक आणि अखनूरमध्ये पाकिस्तानकडून हा गोळीबार करण्यात आला. त्याला भारताकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. भारतानं केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानच्या चार जणांचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी आहेत.

दरम्यान, या भागातील गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्याचा प्रयत्न लष्कराचे जवान करत आहेत. मात्र, काही जण आपलं गाव सोडण्यास तयार नाहीत. शुक्रवारी सकाळी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर त्याच्या दोनच दिवस आधी भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला होता.


loading...

Top 10 News

राशी भविष्य