Monday, 10 December 2018

'आर्मी डे' परेडच्या सरावादरम्यान हेलिकॉप्टरची दोरी तुटली अन्...थराराक अपघात कॅमेऱ्यात कैद

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

आर्मी परेडच्या सरावावेळी हेलिकॉप्टरमधून पडून 3 जवान जखमी झालेत. दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये 9 जानेवारीला ही घटना घडली. या प्रकाराबद्दल लष्कराकडून चौकशी सुरू केल्याची माहिती मिळतेय. भारतीय  सेना 15 जानेवारीला 'आर्मी डे' साजरा करणारेय.

या दिवशी विशेष परेडचं आयोजन करण्यात येतं. दरम्यान, 'आर्मी डे' कार्यक्रमाची तयारी करत असलेल्या जवानांसोबत नवी दिल्लीत हा अपघात घडला आहे. ध्रुव हेलिकॉप्टरमधून उतरवण्याचा सराव करत असताना 3 जवान अचानक उंचावरुन जमिनीवर पडले. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तीनही जवान सुरक्षित असल्याची माहिती समोर आलीय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य