Sunday, 21 October 2018

विदेशी चलनाची तस्करी करताना हवाई सुंदरी जेरबंद, तीन कोटींचे अमेरिकन डॉलर्स जप्त

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

हवालाचे तब्बल तीन कोटी वीस लाख रुपये हाँगकाँगला घेऊन जाणाऱ्या हवाई सुंदरीला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)ने छापा मारला त्यावेळी या हवाई सुंदरीकडे चार लाख ऐंशी हजार डॉलर सापडले. ही हवाई सुंदरी हाँगकाँगला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या फ्लाइटमधील क्रू मेंबर होती. या हवाई सुंदरीसोबतच दिल्लीतील एका हवाला एजंटलाही अटक करण्यात आली आहे.

डीआरआयच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, 7 ते 8 जानेवारीला रात्री दिल्ली विमानतळावर हाँगकाँगला जाणाऱ्या फ्लाईटवर छापा मारण्यात आला. यावेळी यातील एका हवाई सुंदरीच्या बॅगेमध्ये लाखो डॉलर सापडले. हे डॉलर अॅल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून ठेवले होते. या डॉलर्सचं भारतीय मूल्य तब्बल तीन कोटी वीस लाख रुपये एवढे आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य