Tuesday, 18 December 2018

शूजमध्ये सापडली सोन्याची बिस्किटं

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, हैद्राबाद

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आरजीआयए सीमाशुल्क अधिकार्यांनी शनिवारी शामशाबाद येथे हवाई प्रवाशाकडून 350 ग्रॅम सोने हस्तगत केले. या सोन्याची किंमत 10,64,227 इतकी आहे. मस्कत येथून निघणा-या विमानातील प्रवाशाकडून हे सोने जप्त करण्यात आले आहे.

या प्रवाशाकडून हे सोने बिस्किटांच्या स्वरूपात जप्त करण्यात आल्याचे आरजीआयएच्या अधिकार्यांनी सांगितले. या प्रवाशाच्या शूजमध्ये हे सोने सापडले. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौकशी सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य