Sunday, 18 March 2018

लालूंच्या शिक्षेचा निकाल पुन्हा लांबला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, बिहार

चारा घोटाळ्यात दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना सुनावण्यात येणाऱ्या शिक्षेचा निकाल पुन्हा एकदा लांबला आहे. विशेष सीबीआय न्यायालय शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणाचा निकाल सुनावणार आहे. यापूर्वी दोनदा लालूंच्या शिक्षेची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.

तब्बल 21 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला. विशेष न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी निकाल जाहीर केल्यानंतर लगेचच 69 वर्षीय लालूप्रसाद यांना अटक करण्यात आली होती. यानंतर लालूंच्या शिक्षेची सुनावणी दोनदा टळली. त्यामुळे लालूंना आता काय शिक्षा सुनावली जाणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. मात्र, आज पुन्हा एकदा लालूंची शिक्षा टळली. दरम्यान लालूंनी माझ्या प्रकृतीचा विचार करून कमीत कमी शिक्षा करावी, अशी विनंती न्यायाधीशांना केली आहे.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News