Friday, 18 January 2019

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून दलितांच्या अत्याचारात वाढ झाल्याचा मेवानींचा आरोप

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

पुण्यातील शनिवार वाडा येथे चिथावणीखोर भाषण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केल्यानंतर आमदार जिग्नेश मेवानी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिग्नेश मेवानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आगपाखड केलीये.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून दलित अत्याचारामध्ये वाढ झाल्याचं यावेळी जिग्नेश यांनी म्हटलंय. तसेच या देशात दलित सुरक्षित आहेत का असा सवालदेखील यावेळी त्यांनी विचारलाय.

कोरगेवा-भीमा हिंसाचारानंतर मला आणि दलित समाजाला जाणूनबुजून लक्ष्य करण्यात येत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिला तर दलित समाज 2019 च्या निवडणुकीत तुम्हाला चांगला धडा शिकवेल, अशा इशारा मेवाणी यांनी दिलाये.

loading...

Top 10 News

राशी भविष्य