Wednesday, 13 December 2017

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर पक्षातून निलंबित; मोदींबद्दलचं वादग्रस्त वक्तव्य भोवलं

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांना पक्षातून निलंबित करण्यात आलंय. मोदींबद्दल अपशब्द वापरल्याने त्यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून ही कारवाई करण्यात आलीये.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणी शंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना पातळी सोडली होती.

पंतप्रधान मोदी अतिशय नीच व्यक्ती असल्याचे अय्यर यांनी म्हटले. मोदींकडे किमान सौजन्य नसल्याची टीकाही त्यांनी केली.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन करताना मोदींनी नीच राजकारण केले. या राजकारणाची काय गरज होती?,’ असा प्रश्नही अय्यर यांनी विचारला.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News