Saturday, 21 July 2018

रस्त्यावरच्या खड्ड्यात अवतरली जलपरी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

बंगळुरुमध्ये खड्ड्याविरोधात अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आले. या खड्ड्यात चक्क जलपरी अवतरली. खरीखुरी जलपरी नसून ही एक अभिनेत्री आहे.

स्ट्रीट आर्टिस्ट बादल नंजुनदासस्वामी आणि कन्नड अभिनेत्री सोनू गोडवा यांनी हे अनोखं आंदोलन केले. यासाठी बंगळुरुमधल्या एका खड्ड्यातल्या पाण्यात निळा रंग टाकण्यात आला. खड्ड्याला समुद्राचं रुप देण्यात आलं आणि त्यानंतर सोनू गोडवा यांनी खास जलपरीच्या अवतारात इथं आंदोलन केले.

बंगळुरुमध्ये रस्त्यांची अवस्था फारची बिकट आहे. त्यामुळे बरेच अपघात झाले आहेत. एवढे अपघात होऊनही प्रशासन आजही रस्त्यांबाबत अगदी उदासिन आहे. त्यामुळेच हे अनोखं आंदोलन करुन सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

loading...

Top 10 News

Facebook Likebox