Monday, 24 September 2018

अंडे आणि तांदुळानंतर आता प्लास्टिकची साखर बाजारात आल्याने खळबळ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

प्लास्टिकचे अंडे आणि तांदुळानंतर आता प्लास्टिकची साखर सुद्धा बाजारात विकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला.

ओडिशातील कालाहंडी भागात हा प्रकार घडला. कोकसारा गावातून एका महिलेने साखर विकत घेतली. घरी गेल्यानंतर त्या महिलेने चहा बनवताना ती साखर त्यात टाकली.

पण, शेवटपर्यंत साखर विरघळलीच नाही. प्लास्टिकची साखर आढळण्याची ही पहिलीच घटना आहे.

यासंदर्भात फुड इन्स्पेक्टरकडे तक्रार दाखल करण्यात आली. तसेच या साखरेचे नमुने अधिक तपासासाठी लॅबमध्ये पाठवण्यात आलेयत. त्यानंतरच पुढची कारवाई करण्यात येणार.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

Facebook Likebox