Monday, 24 September 2018

वायू गळतीमुळे 300 शाळकरी मुलांची प्रकृती खालावली

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

उत्तर प्रदेशच्या साखर कारखान्यात वायू गळती झाल्यामुळे जवळच्या शाळेतल्या 300 मुलांची प्रकृती खालावली आहे.

 

शामलीतल्या शुगर मिलमध्ये वायू गळती झाली. त्यामुळे जवळच्याच शिशु मंदिरात शिकणाऱ्या 300 मुलं अत्यवस्थ झाली. डोळे जळजळणं, उल्टी आणि चक्कर येणं ही लक्षण दिसायला लागल्यामुळे त्यांना जवळच्याच रुग्णालयात हलवले.

 

त्यातल्या 35 मुलांची प्रकृती ही चिंताजनक असल्यामुळे त्यांना मेरठला हलवण्यात आले. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप होत आहे. तर या शुगर मिलवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

Facebook Likebox