Wednesday, 19 September 2018

रेल्वेची 36 वर्षांची परंपरा मोडीत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर रेल्वेनेही व्हीआयपी कल्चरला तिलांजली देण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी रेल्वेतून व्हीआयपी कल्चर घालविण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना मिळणारी 'व्हीआयपी ट्रीटमेंट' बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

शिवाय घरी आणि कामाच्या ठिकाणी साधेपणाचा अवलंब करा, असं आवाहनही त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केले आहे.

 

रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या विभागीय भेटी दरम्यान रेल्वे व्यवस्थापक आणि इतरांना हजर राहणे बंधनकारक होते. याशिवाय प्रोटोकॉलच्या नावाखाली रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या आगमनावेळी हाताखालच्या अधिकाऱ्यांना फुलांचा गुच्छ आणि भेटवस्तू घेऊन त्यांच्या स्वागतासाठी जाणे बंधनकारक होते. मात्र रेल्वे मंत्रालयाने ऐतिहासिक पाऊल उचलून 36 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा मोडीत काढली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

Facebook Likebox