Sunday, 23 September 2018

हनीप्रीतला 6 दिवसांची पोलीस कोठडी

User Rating: 4 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पंचकुला (हरियाणा) 

पंचकुला-डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिम याची दत्तक मुलगी हनीप्रीतला कोर्टात हजर करण्यात आले आहे. हनीप्रीतला सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलिसांनी कोर्टाकडून हनीप्रीतच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती मात्र, कोर्टाकडून तिला 6 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

राम रहिमला बलात्कार प्रकरणी दोषी ठरवल्यानंतर हरियाणा, पंजाब आणि दिल्लीमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. हिंसाचारात 38 लोकांचे प्राण गेले होते तर 364 जण जखमी झाले होते. या हिंसाचाराला हनीप्रीत जबाबदार असल्याचा पोलिसांना संशय होता. हनीप्रीत फरार असल्याने पोलीस तिचा कसून शोध घेत होते. हनीप्रीत सापडल्याने कोर्टात तीला सादर करण्यात आले असून तिला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

Facebook Likebox