Tuesday, 12 December 2017

उद्योगपती वियज मल्ल्याला लंडनमध्ये अटक आणि जामीन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, लंडन

 

किंगफिशर उद्योग समुहाचा मालक विजय मल्ल्याला लंडमनध्ये अटक करण्यात आली आहे. मल्ल्यावर 17 बँकांचं 9 हजार कोटींचे कर्ज बुडवल्याचा आऱोप आहे. 30 मार्च 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याला पासपोर्टसह हजर राहायला सांगितले होते.

 

या प्रकरणाची चौकशी सुरु होताच 2 मार्च 2016 रोजी मल्ल्या देशातूनच फरार झाला. यानंतर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने मल्ल्याला अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं मल्ल्याला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने ब्रिटनसोबत पत्रव्यवहार सुरु केला आणि भारताच्या या प्रयत्नांना यश आले.

 

अखेर 18 एप्रिल रोजी स्कॉटलैंड यार्डने मल्ल्याला अटक केली. पुढे त्याचा तात्काळ जामीन मंजुर झाला. भारतात विजय मल्ल्याविरोधात 6 पेक्षा जास्त अटक वॉरंट बजावण्यात आले आहेत. 03 ऑक्टोबर 2017 रोजी पुन्हा ईडीकडून विजय मल्ल्याला अटक करण्यात आली आणि तात्काळ जामीनही मंजुर झाला. त्याबाबत ब्रिटनच्या न्यायालयात आता पुढची सुनावणी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News