Tuesday, 22 January 2019

लंडनमधील भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये भीषण स्फोट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, लंडन

 

लंडन पून्हा एकदा स्फोटाने हादरले आहे. लंडनमधील पारसन्स ग्रीन मेट्रो स्टेशनवर स्फोट झाला आहे. स्थानिक माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार मेट्रो ट्रेनमध्ये एका पांढऱ्या रंगाच्या बादलीमध्ये स्फोटक पदार्थ आढळून आले. 

 

लंडनमधील स्थनिक वेळेनुसार सकाळी 8.20 च्या सुमारास हा स्फोट झाल्याचे समजते. या स्फोटात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. या स्फोटात काही प्रवाशांचे चेहरे देखील भाजले गेले आहेत.

 

पारसन्स ग्रीन मेट्रो स्टेशन हे भुयारी भागात आहे. सुरक्षा व्यवस्था कडक असूनदेखील स्फोटके मेट्रोमध्ये आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य