Thursday, 15 November 2018

अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अबु इस्माईलचा खात्मा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अबु इस्माईलसह एका दहशतवाद्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केले.

 

श्रीनगरमधील नौगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत अबू इस्माईल मारला गेला. मूळचा पाकिस्तानी असलेला इस्माईल हा अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता.

 

अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अबूच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी विशेष मोहिम हाती घेतली होती.  दहशतवादी अबू दुजाना मारला गेल्यानंतर अबू इस्माईल हा जम्मू-काश्मीरमधील लष्कर-ए-तोयबाचा कमांंडर झाला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य