Wednesday, 19 December 2018

पंतप्रधान मोदींनी देशभरातील तरुणांशी साधला संवाद !

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत एका खास कार्यक्रमातून देशातील तरुणांशी संवाद साधला आहे. विवेकानंदांच्या शिकागो भाषणाला 125 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘स्टुडंट लिडर्स कन्वेंशन’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मोदींच्या या भाषणाचे सर्व कॉलेजेस मध्ये थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले.  

 

या भाषणात पंतप्रधान मोदींनी विवेकानंदांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. मोदींनी विवेकानंदांचे आचारविचार तरुण पिढीला पुन्हा एकदा नव्याने अवगत करुन दिले. पंतप्रधान मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले की, ‘विवेकानंदांचे काही क्षणाचे ते भाषण 125 वर्षानंतर सुद्धा जिवंत आहे, जगात कोणीच विचार केला नसेल की एखाद्या भाषणाचे 125 वे वर्ष पण साजरे केले जाऊ शकते’.

 

मोदींनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की, ''वंदे मातरम म्हणण्याचा पहिला अधिकार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा आहे. वंदे मातरम् ऐकल्यावर रोमांच उभे राहतात, रस्त्यावर कचरा टाकून वंदे मातरम् म्हणणं अयोग्य आहे. विवेकानंदांनी देशातील चुकीच्या गोष्टीवर टीका केली. विवेकानंदांनी फक्त उपदेश दिला नाही, त्यांनी रामकृष्ण मिशन स्थापन केले. प्रत्येक वाईट गोष्टींविरुध्द आवाज उठविला''.

loading...

Top 10 News

राशी भविष्य