Monday, 10 December 2018

व्यंकय्या नायडू देशाचे 15वे उपराष्ट्रपती

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

भारताचे राष्ट्रपती म्हणून राम नाथ कोविंद यांची निवड झाली. तर उपराष्ट्रपती म्हणून वैंकय्या नायडू यांची निवड झाली. राम नाथ कोविंद हे भारताचे चौदावे राष्ट्रपती आहेत.

25 जुलैला मावळते राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडून त्यांनी राष्ट्रपतीपदाची सुत्र स्विकारली. त्यानंतर आता भाजपच्या व्यंकय्या नायडू यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली.

विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याकडून ते पदाची सुत्र स्विकारतील. हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपुष्टात येणार आहे. अन्सारी यांनी सलग दोन टर्म उपराष्ट्रपती म्हणून काम पाहिले आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. 

 

कोण आहेत व्यंकय्या नायडू?

 

1972 मध्ये जय आंध्र आंदोलनामुळे चर्चेत

1973मध्ये आंध्र विश्वविद्यालयातल्या छात्र संघाचे अध्यक्ष म्हणून राजकिय कारकिर्दीची सुरुवात

1977-80 दरम्यान जनता पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष म्हणून निवड

1978-85मध्ये आंध्र प्रदेश विधान सभेचे आमदार म्हणून निवडले गेले

1988 मध्ये आंध्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष म्हणून निवड

1993 मध्ये भाजपचे राष्ट्रीय महासचिवपदी निवड

1998 पासून कर्नाटकमधून सलग 3 वेळा राज्यसभेचे सदस्य

सध्या राजस्थानमधून भाजपचे राज्यसभेचे खासदार

व्यंकय्या नायडूंना 25 वर्षांच्या संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव

हिंदी चांगली बोलू शकणारा दक्षिणेतला भाजपचा एक महत्वाचा चेहरा

loading...

Top 10 News

राशी भविष्य