Saturday, 24 February 2018

सोनीला मागे टाकत स्टार इंडियाने सर्वाधिक बोली लावत विकत घेतले IPL च्या प्रक्षेपणाचे हक्क

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आयपीएलचा फिवर सुरु झाला की सर्व टीव्ही सेटवर फक्त सोनी चॅनेल दिसते. आता मात्र, सोनी चॅनेल ऐवजी स्टार टीव्हीवर आयपीलएचे सामने पहायला मिळणार आहेत. सोनीला मागे टाकत  स्टार इंडियाने सर्वाधिक बोली लावत IPL च्या प्रक्षेपणाचे हक्क विकत घेतले आहेत.

 

जगभरात आयपीएलचे टिव्ही आणि मिडिया प्रक्षेपणाचे हक्क विकत घेण्यासाठी एकत्रित बोली लावली जात होती. या बोलीमध्ये स्टार इंडियाने आयपीएलसाठीचे टिव्ही आणि मिडिया हक्कांठी सर्वाधिक म्हणजेच 16,347.50 करोड रुपयांची बोली लावत हे विकत घेतले आहेत.

 

2018 ते 2022 पर्यंत आयपीएल प्रक्षेपणाचे हक्क स्टारकडे असणार आहेत.

 

भारतीय उपमहासंचालक आणि जागतिक बाजारपेठेत पुढील पाच वर्षांसाठी प्रसारण आणि डिजिटल अधिकारांसाठी बोली लावण्यासाठी निवीदा काढण्यात आली होती. यात 24 कंपन्यांनी सहभाग घेतला.

 

पाच वर्षांच्या प्रक्षेपणासाठी स्टारने 16 हजार 374 कोंटींची बोली लावली होती. स्टारची बोली सर्वाधिक असल्यामुळे त्यांना हक्क देण्यात आले आहेत. स्टारनंतर सोनीने दुसऱ्या क्रमांकाची बोली लावली होती. सोनीनं 11,050 कोटींची बोली लावली होती. तर डिजीटल हक्कांसाठी फेसबुकनेही 3,900 कोटींची बोली लावली होती.

 

2008 मध्ये सोनीने जवळपास 8 हजार कोटींना 10 वर्षांसाठी हक्क विकत घेतले होते.  

 

Top 10 News

Facebook Likebox

Popular News