Sunday, 22 April 2018

24 तास ऑनड्युटी असणाऱ्या पोलिसांसाठी आनंदाची बातमी

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

24 तास ऑनड्युटी असणाऱ्या पोलिसांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दैनंदिन ड्युटी, बंदोबस्ताच्या वेळापत्रकाप्रमाणे आता त्यांच्या सुट्टीचंही कॅलेंडर बनणार आहे.

 

पोलीस कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेचे कॅलेंडर बनवण्यात यावे, असे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षकांना दिले.

 

प्रत्येक पोलिसाला आपल्या कुटुंबाला वेळ देता यावा, यासाठी साप्ताहिक सुट्टी आणि वर्षातून किमान 15 दिवस अर्जित रजा त्यांना मिळणार आहेत.

 

तसंच एखाद्याच्या घरी समारंभ असल्यास किंवा गंभीर आजारासारखी परिस्थिती उद्भवल्यास त्यांना अर्जित रजेला वगळून वाढीव रजाही मंजूर केली जाणार आहे.

loading...

Top 10 News

Facebook Likebox

Popular News