Sunday, 23 September 2018

रक्तदानाची किंमतच उरली नाही का?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रक्तदान हे महादान असं समजलं जाते. मात्र, या रक्तदानाची किंमतच उरली नसल्याचं चित्र दिसून येत आहे.

 

मुंबई आणि उपनगरातल्या 34 सरकारी आणि पालिकेच्या रक्तपेढ्यांमधलं  1 हजार 92 युनिट्स रक्त वाया गेल्याची घटना समोर आली आहे.

 

जानेवारी ते जून 2017 या 6 महिन्यातल्या अहवालाची धक्कादायक माहिती उघडकीस आली.

 

रक्तपेढ्यांमधलं रक्त अपुऱ्या व्यवस्थापनामुळे वाया गेल्याचं समजते. एकीकडे रक्त न मिळाल्यामुळे लोकांचे जीव जातात. तर, दुसरीकडे फक्त व्यावस्थापनाअभावी रक्त वाया गेल्याची दुर्दैवी घटना घडली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

Facebook Likebox