Wednesday, 20 June 2018

बुलेट ट्रेनवरुन शिवसेनेने पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गुरुवारी साबरमतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. मात्र सामनातून मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनवर टीका करण्यात आली आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे व्यापारी वर्गाचे आणि श्रीमंताचे कल्याण होईल असा आरोपही सामनातून करण्यात आला आहे.

 

बुलेट ट्रेन प्रकल्पाने रोजगारनिर्मिती होईल असे सांगणारे थापाच मारत असल्याचे म्हटले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि काम सुरू असताना जपानची कंपनी खिळय़ापासून रुळापर्यंत, खडीपासून सिमेंटपर्यंत सर्व तंत्रज्ञान त्यांच्या देशातून आणणार आहे. राष्ट्रीय गरजांत जपानची अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन बसते काय ? असा सवाल करत एवढाच मुद्दा असल्याचे सामनातून म्हटले आहे.

भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यास जपानी कंपनीने विरोध केला असल्याचा आरोप सामनातून करण्यात आला आहे. जमीन आणि पैसा महाराष्ट्र आणि गुजरातचा,  लाभ मात्र जपानचा असे म्हणत त्यांनी गुजरातच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे व्यापारी वर्गास नवे काहीतरी द्यावेच लागेल असल्याचे म्हटले आहे.


ही लूट आणि फसवणूक असली तरी पंतप्रधान मोदींच्या स्वप्नपूर्ती प्रकल्पास आम्ही शुभेच्छा देत आहोत असे वक्तव्य करण्यात आले आहे.  मुंबईची लूट बुलेट ट्रेनने होऊ नये हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना! असे म्हणत त्यांनी बुलेट ट्रेनवरुन निशाणा साधला आहे. 

loading...

Top 10 News

Popular News

Facebook Likebox