Thursday, 23 November 2017

...म्हणून मुख्यमंत्र्यांनी हवामान खात्याला पाठवले होते ते नाराजीचे पत्र

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

हवामान खात्याने पावसाबाबत वर्तवलेल्या अंदाजावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाराजीचे तसे पत्रच त्यांनी हवामान खात्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाला धाडले आहे.

 

29 ऑगस्टला मुंबईमध्ये 26 जूलैच्या महापूराची पुनरावृत्ती झाली होती. त्यादिवशी मुंबई आणि परिसरामध्ये सरासरी 300 मिमि पाऊस पडला होता. लोकल सेवा आणि रस्ते वाहतूक ठप्प झाल्यामुळे नागरिकांमध्ये हालाखीची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान हवामान विभागाकडून मुंबईमध्ये दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस कायम राहण्याचा इशारा देण्यात आला होता.

 

मुंबईकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने, सरकारी कार्यालयातील अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनीच हजर रहावे असे आदेश दिले होते. त्यामुळे 30 ऑगस्टला अनेक सरकारी कार्यालयामध्ये शुकशुकाट होता. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळा व महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर केली होती.

 

प्रत्यक्षात मात्र, 30 ऑगस्टला पावसाचा जोर कमी होता. रेल्वे स्थानक आणि रस्त्यांवरील पाणी देखील ओसरले होते. हवामान विभागाचा अंदाज चुकल्यामुळे शासकीय कामाचा दिवस पुरता वाया गेला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवामान विभागाला नाराजीचे पत्रच लिहिले.

 

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News