Thursday, 23 November 2017

सप्टेंबर महिन्यातच मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा तडाखा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ऑक्टोबरमधील ऊन्हाचा तडाखा मुंबईकरांना सप्टेंबर महिन्यातच सोसावा लागत आहे. त्यामुळे घामाघूम झालेल्या मुंबईकरांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.

 

पावसाने दडी मारूनही मुंबईवर डेंग्यू, मलेरियाचे सावट कायम असल्याने मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून सतत केले जात आहे.

 

पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पालिका रुग्णालयात मलेरियाचे 271 रुग्ण आढळले आहेत. तर, गॅस्ट्रोचे 200 आणि डेंग्यूचे 102 रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, स्वाइन फ्लूचे २० रुग्ण आढळले आहेत.

 

त्यामुळे मुंबई शहर-उपनगरांत साथीच्या आजारांचा आलेख चढत्या क्रमात असल्याचे चित्र दिसून आले आहे. म्हणूनच वेळोवेळी प्रशासनातर्फे मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News