Monday, 16 July 2018

मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना; भाजपचे तीन तर शिवसेनेचे दोन नेते उपसमितीत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठा क्रांती मोर्चाने शिस्तबद्ध पद्धतीने विराट मोर्चे काढून संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतले. आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना केली आहे.

 

या उपसमितीमध्ये महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर या 5 सदस्यांचा समावेश आहे.

 

चंद्रकांत पाटील हे या उपसमितीचे अध्यक्ष असतील. ही उपसमिती मराठा आरक्षणाबाबत समन्वय ठेवण्यासाठी संबंधित घटकांशी चर्चा करणार आहे. 9 ऑगस्ट रोजी मराठा समाजाचा विराट मोर्चा मुंबईत धडकलेला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आश्वासनानंतर मोर्चाचा समारोप झाला होता.

loading...

Top 10 News

Facebook Likebox