Monday, 16 July 2018

‘त्याने’ पोलीसाला उडवले अन् त्याला बोनेटवरुन फरफटत नेले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

ठाण्यात एका पोलीस शिपायाला चार चाकी गाडीने उडवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कर्तव्य बजावत असणारा पोलीस शिपाई या अपघातात जखमी झाला.

 

ठाण्यात संशयास्पद फिरणाऱ्या व्हॅगनार या चार चाकीला अडवण्याचे आदेश कंट्रोल रुमकडून पोलिसांना मिळाले. त्यानंतर पोलीसांना कोपरीजवळ ही गाडी दिसली.

 

पोलिसांनी ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने पोलीस शिपायाच्या अंगावर गाडी घातली. चालक पोलिसाला बोनेटवर घेऊन हायवेच्या दिशेने निघाला.

 

या थरारनाट्यानंतर नागरिकांनी वाहनचालकाला थांबवून चांगलाच चोप दिला. यादरम्यान गाडीत असलेली महिला फरार झाली असून तिचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी खूनाचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळा आणल्याने नौपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading...

Top 10 News

Facebook Likebox