Wednesday, 15 August 2018

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजप नगरसेवकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण

 

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजप नगरसेवक आणि शिक्षण मंडळाचे माजी सभापती दया गायकवाड यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ठाण्यातील एका तरुणीने हा आरोप केला असून, वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दया गायकवाड यांनी फेसबुकवरुन आपल्याशी ओळख केली. लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. मात्र नंतर दया विवाहित असल्याचं तरुणीला समजले.

 

तसेच या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी अश्विनी धुमाळ आणि त्यांचे पती यांनी गायकवाडांना मदत केल्याचेही या तरुणीनं तक्रारी केली. त्यानुसार ठाण्याच्या वर्तकनगर पोलिस स्टेशनमध्ये दया गायकवाड यांच्यासह अश्विनी आणि मनोज धुमाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading...

Top 10 News

Facebook Likebox