Wednesday, 15 August 2018

सचिन तेंडुलकर करणार ‘त्या’ मुंबईकरांची मदत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची समाज कार्याच्या पीचवर दमदार बॅटिंग सुरु आहे. सचिन पुन्हा एकदा अशाच सामाजिक कार्याचा भाग म्हणून 'मिशन २४ मुंबई या प्रकल्पांतर्गत नवीन उपक्रम राबवणार आहे. मुंबईतल्या मानखुर्द, चेंबुर भागात सचिनच्या उपक्रमांर्गत सेवासुविधा पुरवण्यात येणार आहे. क्रिडांगणाची व्यवस्था, शाळेतील स्वच्छतागृह यासारख्या सेवासुविधांचा यात समावेश असणार आहे.  

सचिन तेंडुलकर यांच्या सासू अनाबेल मेहता यांची अपनालय ही संस्था आहे. या  अपनालय संस्थेच्या  माध्यमातून सचिन तेंडुलकर उपक्रम राबवणार आहे. या प्रकल्पासाठी विदेशातून आलेल्या तज्ञांची सुध्दा मदत घेण्यात येणार आहे.

भारतरत्न सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही सामाजिक संस्थांसाठी तो काम करत आहे. गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करण्यासाठी सचिन प्रयत्नशील  आहे. खासदार निधीमधूनही त्याने अनेक उपक्रम राबवले आहेत. क्रिकेट अकॅडमी सुरु करण्याचा मानस असल्याचेही त्याने सांगितले आहे. 

loading...

Top 10 News

Facebook Likebox