Monday, 16 July 2018

रेल्वे ट्रॅकवर शिडी ठेवणाऱ्या तिघांना अटक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रेल्वे ट्रॅकवर शिडी ठेवणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेले तिघेही अल्पवयीन आहेत. ही घटना नवी मुंबईत घडली.

 

मोटरमनच्या प्रसंगावधानानं मोठा जीवघेणा अपघात टळला. कोरपखैराणा परिसरात राहणाऱ्या तिघांनी ॲल्युमिनीयमची शिडी चोरली होती.

 

पैसे मिळवायच्या उद्देशानं ही शिडी चोरण्यात आली. त्यानंतर तिचे तुकडे करण्यासाठी या मुलांनी रेल्वे ट्रॅकवर शिडी आडवी करून ठेवली.

 

संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास वाशीकडे जाणाऱ्या लोकलच्या मोटरमननं ही शिडी पाहिली आणि लोकल थांबवली. नंतर मोटरमननं खाली उतरून शिडी बाजूला

केली आणि कंट्रोल रुमला यासंपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तुर्भे पोलिसांनी कारवाई करत या तीघांना अटक केली.

loading...

Top 10 News

Facebook Likebox