Monday, 16 July 2018

जीवापेक्षा सेल्फी महत्त्वाचा नाही

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मालगाडीवर चढू सेल्फी काढणं अंबरनाथमध्ये तरुणाच्या जीवावर बेतले. सेल्फी घेत असताना ओव्हर हेड वायरचा शॉक लागून तो खाली कोसळला आणि शुक्रवारी रात्री

उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 

अनिकेत थोरात असं या मृत तरुणाचं नाव आहे. अंबरनाथच्या यार्डात उभ्या असलेल्या एका मालगाडीवर तरुण चढला आणि सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात ओव्हरहेड

वायरचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला.

 

सेल्फीच्या नादात वारंवार अशा दुर्घटना होत असतात. अशा जीवघेण्या ठिकाणाहून अनेकांना सेल्फी घेण्याचा मोह होतो आणि मोह जीवघेणा ठरतो.

 

त्यामुळे वारंवार 'जय महाराष्ट्र' वाहिनी तरुणांना आणि खास करून असे सेल्फी घेणाऱ्यांना आवाहन करत असतं की, असे जीवघेणे सेल्फी काढू नका.

loading...

Top 10 News

Facebook Likebox