Monday, 23 July 2018

म्हणून मेट्रो-3 प्रकल्पाचं काम रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत बंद ठेवणार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई उच्च न्यायालयानं रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत मेट्रो-3 चे कामकाज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मेट्रो-3 प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतील रहिवाशांना होणारा त्रास लक्षात घेता हा आदेश देण्यात आला.

 

मेट्रो-3 च्या दिवस-रात्र सुरु असणाऱ्या कामामुळे कफ परेडमधील नागरिकांना आवाजाचा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांना झोप मिळत नसून काही नागरिक आजारांनी जखडलेले आहेत.

 

त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्यामागे दहा हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. तसेच मेट्रोचा रात्रीचा आवाज बंद करावा, अशी मागणी या रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयानं मेट्रो-3 चे कामकाज रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले.

loading...

Top 10 News

Facebook Likebox